बेळगाव : भारतीय वायुसेनेचे आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक, तायक्वांदो मास्टर श्रीपाद आर राव यांच्या यक्षिक्त युवा फाउंडेशन तर्फे आयोजित कणकुंबीच्या जंगलात अॅन द् एस्केपेड अॅट वूड्स दोन दिवसीय साहस शिबिर उत्साहात पार पाडले. सदर शिबीर 5 ते 17 वयोगटातील मुलांसाठी व्हॅली क्रॉसिंग, ट्रेकिंग, नाईट मार्च, टेंट पिचिंग, नाईट व्हिजिल आणि विशेष तायक्वांदो सराव सत्र सोबत इतर अनेक गिर्यारोहण क्रियाकलापांचा समावेश होत. या उत्कंठावर्धक शिबिरात बेळगावच्या विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हे शिबिर भारतातील प्रसिद्ध साहसी तज्ञ संजय जवळकर व त्यांचे पुत्र ऋषिकेश जावळकर यांचे मार्गदर्शनात पार पडले. लिटिल स्कॉलर्स अकादमी येथील आरुष टूमरी व स्तुती टूमरी, बेन्सन्स यमनापूर येथील मोहम्मदशफी लतीफशाह चांदशाह व मोहम्मद लतीफशाह चांदशाह, श्री स्वामी विवेकानंद स्कूल कडोली येथील सान्वी पाटील, सेंट जॉन्स काकती येथील आयुष चंद्रशेखर साळूखें, संजय घोडावत स्कूलच्या सोयरा घाडी, दीप पाटील, सानवी वासोजी, तन्वी इनुकुर्ती, अन्वी बागी आणि लिंगराज पदवी पूर्व कॉलेजातून त्रिवेणी बडकन्नावरने हा उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. शिबिरार्थीना भारतातील सुप्रसिद्ध एडवेंचरिस्ट आणि पर्वतारोहक ऋषिकेश जवळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले.
Previous Articleकाँग्रेसचे निवडणूक ‘न्यायपत्र’ घोषित
Next Article साईराज वॉरियर्स, रोहन ट्रेडर्स बीएससी संघांचे विजय
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.