वार्ताहर /हरमल
आषाढी एकादशी निमित्त हरमल येथील युवकांनी पायीवारीने सांखळी विठ्ठलापूर येथील श्री विठ्ठल मंदिरात जाऊन श्रींचा आशीर्वाद घेतला.
येथील युवकांनी सकाळी 6 वा. पायीवारीस प्रारंभ केला. शिवोली श्री स्वामी समर्थ मठात, कोलवाळ श्री राम मंदिर, थिवी, अस्नोडा, डिचोली मार्गे श्री विठ्ठल मंदिरात संध्याकाळी 4 वा. च्या दरम्यान पोचले. यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष सुखानंद नाईक, भरत वस्त, उपसचिव प्रकाश नाईक, उपखजिनदार राघोबा गावडे, माजी अध्यक्ष भाऊ गडेकर, नीलेश कुडव, साईदास नाईक, कल्पेश नाईक, महादेव गावडे, यशवंत नाईक आदी 30 जणांचा समावेश होता. युवकांच्या या पायीवारी बद्दल पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे.