प्रतिनिधी/कोल्हापूर
राज्याचे पर्यावरणमंत्री तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आयोध्या दौऱयात कोल्हापूर जिल्हय़ातील युवासेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले आहे. आदित्य ठाकरे आज बुधवारी आयोध्येतील राम मंदिराचे दर्शन घेणार आहे. त्यांच्या या पूर्व नियोजित दौऱयात राज्यातील सर्व जिल्हय़ातील युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक जिल्हय़ातील पाच पदाधिकारी, कार्यकर्ते असे तीनशेहून अधिक जण आयोध्येला रवाना झाले. कोल्हापूर जिल्हय़ातून युवासेनेचे जिल्हा प्रमुख मंजित माने, विस्तारक डॉ. सतीश नरसिंग, समन्वयक योगेश चौगुले, योगेश चव्हाण, मंगेश चितारे, देवशिष भोजे आदी पदाधिकारी रेल्वेने आयोध्येला मंगळवारी पोहचले. बुधवारी आदित्य ठाकरे यांच्याबरोबर प्रभू श्रीरामाच्या मंदिरात जावून दर्शन घेणार आहेत. आरतीनंतर त्यांची सभा होणार आहे.