अटकपूर्व जामीन अर्जावर कोर्टाचा अंतरिम आदेश
प्रतिनिधी/ मडगाव
दक्षता खात्याचे पोलीस अटक करतील या भीतीपोटी मडगावच्या न्यायालयात धाव घेतलेले धिरज सावंत याना अटक केलीच तर 25 हजार रुपयांच्या बॉण्डवर त्यांना जामिनावर सोडण्याचा न्यायालयाने शनिवारी 16 रोजी आदेश दिला.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश चोलू गावस यांच्या न्यायालयात या अटकपूर्व जामीन अर्जावर काल शनिवारी सुनावणी झाली. त्यावेळी अंतरिम आदेश जारी करताना न्यायालयाने वरीलप्रमाणे अर्जदाराला सवलत दिली.
धिरज सावंत याना भ्रष्टाचार विरोधी पोलिसांनी अटक केलीच तर 25 हजार रुपयांच्या बॉण्डवर जामिनावर सोडण्याचा न्यायालयाने अंतरिम आदेश दिला. अर्जदार सावंत यांच्यावतीने ऍड. जे. लोपीस यांनी तर सरकारपक्षाच्यावतीने सरकारी वकील डी. कोरगावकर यांनी काम पाहिले.
अटकपूर्व जामीन अर्जावरील नियमीत सुनावणी आता 21 मे रोजी निश्चित करण्यात आली आहे.