- मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना प्रतिबंधक लस तयार करणारेसिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला आणि त्यांच्या कुटुंबाला झेस प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. सद्य परिस्थिती त्यांना आय श्रेणी सुरक्षा दिली जात आहे.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने यापूर्वीच घेतला आहे. पुनावाला यांच्या जीवाला असलेल्या धोका पाहता केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काही राजकीय व्यक्तींकडून पुनावाला यांना धमक्या आल्याच्या प्रकरणात पोलीस तपासाची मागणी करण्यात आली आहे. सिरमने कोविशिल्ड लस तयार केली असून देशात आणि परदेशात त्याचा वापर यशस्वीपणे सुरू झाला आहे. मात्र सीईओ पुनावाला यांनी नुकतेच परदेशी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वतःच्या जीवाला धोका असल्याचे जाहीर केले आहे. काही राज्यांचे मुख्यमंत्री आणि बड्या व्यक्तींकडून फोनवरून धमकाविण्यात आले आहे, असे या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे.
पुनावाला कुंटुबासह ब्रिटनमध्ये गेले आहेत. त्यांच्या या विधानांमुळे राज्यात आणि देशात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता ऍड. दत्ता माने यांनी उच्च न्यायालयात बुधवारी जनहित याचिका दाखल केली आहे.
यासोबतच अदर पूनावाला यांना लस पुरवठ्यावरुन धमकी देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.