प्रतिनिधी/ रत्नागिरी :
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनिल लाड यांच्यासह जिल्हय़ातील 7 पोलीस अधिकारी-कर्मचाऱयांना अत्यंत मानाचे पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आह़े लाड यांच्यास सावर्डेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड, पोलीस हवालदार जाधव, विजय आंबेकर, संदीप नाईक, रमेश चव्हाण आणि उदय भोसले यांना हा सन्मान जाहीर झाला आहे. गृहविभागाकडून याबाबतची घोषणा होताच या अधिकारी-कर्मचाऱयांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
लाड यांनी अनेक गुन्हय़ांच्या तपासात महत्वपूर्ण कामगिरी बजावली आह़े अलीकडेच खेडशी येथे झालेल्या 13 वर्षीय मुलाच्या खूनाचा छडा केवळ 48 तासात लावण्यात लाड यांना यश आले होत़े कारोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 4 रूग्ण आढळून आले होत़े या परिस्थितीत लॉकडाऊन, संचारबंदीची अंमलबजावणी, चोख बंदोबस्त ठेवणे व कायदा व सुवस्था राखण्यात लाड यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आह़े त्यांच्या संपुर्ण कामगिरीची दखल घेऊन त्यांना पोलीस दलातील अत्यंत मानाचे महासंचालक पदक जाहीर झाले आहे.