प्रधान मंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेचे उद्घाटन
प्रतिनिधी / बेळगाव
एसकेई सोसायटीच्या परिसरात असणाऱया युनियन बँक भवनमध्ये फ्युचर बिल्ड व स्कील झोन संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेल्या प्रधान मंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेचे उद्घाटन बुधवारी एसकेईचे चेअरमन किरण ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ते म्हणाले, आज जगभरात संगणक शिक्षणाला महत्व प्राप्त झाले आहे. संगणकामुळे जगात क्रांती झाली आहे. मात्र अनुभवाचे शिक्षण हे पुस्तकी ज्ञानापेक्षा श्रे÷ असून बील गेडस् हे अनुभवाच्या शिजोरीवरच संगणकाचा शोध लावू शकले. शिक्षकांनी विद्यार्थी प्रिय व्हावे, विद्यार्थ्यांची गुणवत्ता हेरुन त्यांना योग्य मार्गदर्शन करावे व गरजू परंतु होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षकांनी पुस्तके व अन्य शैक्षणिक मदत करुन त्याच्या विकासाला हातभार लावाला. स्कील झोन संस्थेच्या संचालिका सुमती शिरगाव यांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी बेळगाव जिल्हा इंडस्ट्रीजचे उपसंचालक रविंद्र मदीहळ्ळी यांनी कर्नाटक सरकारकडून मिळणाऱया आर्थिक सवलतींची माहिती दिली. या संस्थेला सहाय्य करणाऱया कर्नाटक ग्रामीण विकास बँकेचे शाखा व्यवस्थापक शशांक भट्ट, महावीर सौहार्द संस्थेचे चेअरमन महावीर निलजगी उपस्थित होते. सुमती शिरगाव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यांच्यासह किरण शिरगाव, शशिकांत सोलापुरे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन नवमी सोलापूर यांनी केले.