स्मार्टसिटीच्या अर्धवट कामांमुळे घडली घटना
प्रतिनिधी/ बेळगाव
मोटारसायकलवरुन पडून ओंकारनगर-वडगाव-अनगोळ येथील एक युवक गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी रात्री गोगटे कॉलेजसमोर स्मार्टसिटी योजनेच्या कामासाठी रस्त्यावर टाकण्यात आलेल्या खडीमुळे दुचाकी घसरुन ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
महेश मारुती टक्केकर (वय 30, रा. ओंकारनगर-वडगाव-अनगोळ) असे त्या जखमी युवकाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातात महेशच्या डोक्मयाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर घटनास्थळी गर्दी जमली होती. जखमी महेश हा खडीवर पडला होता. त्याच्या पर्समधील आधारकार्डवरुन नागरिकांनी ओंकारनगर-अनगोळ येथील त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.