कोरोना आता मोठय़ा प्रमाणात पसरू लागला आहे, त्यामुळे टेलिव्हिजन अभिनेत्यांना अनिवार्यपणे घरात थांबावे लागत आहे आणि लॉकडाऊन पाळावे लागत आहे. या काळात, हे कलाकार त्यांचा वेळ घालविण्यासाठी वेगवेगळय़ा प्रकारचे उपक्रम करत आहेत. वेगवेगळे स्वयंपाकाचे प्रकार शिकणे, दररोज वर्क आऊट करणे, वाद्ये वाजविणे या गोष्टींमध्ये कलाकार मन रमवत आहेत. खतरों के खिलाडी सीझन 10 ची लोकप्रिय स्पर्धक, अभिनेत्री अमृता खानविलकर या लॉकडाऊनच्या काळात काहीतरी वेगळे करत आहे. तिने एक लॉकडाऊन डायरी तयार केली आहे आणि तिचे डिअर डायरी असे लाडके नाव ठेवले आहे आणि ती त्यात अतिशय धार्मिकपणे लिहीत आहे. ही डायरी म्हणजे तिचे जर्नल आहे आणि त्यात ती तिच्या दररोजच्या कामांचा उल्लेख विनोदी पद्धतीने करते आहे.
यावर बोलताना अमफता खानविलकर म्हणाली, ‘लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात मी झोपणे, खाणे आणि काही वर्कआऊट करणे अशा रितिने माझा वेळ घालविला. काही काळानंतर, मला जाणवले की काहीतरी नवीन शोधले पाहिजे जे मी माझ्या व्यस्त काळात करू शकणार नाही. मग मी माझ्या जर्नलमध्ये गोष्टी लिहायला सुरुवात केली व तिचे नाव मी डिअर डायरी असे ठेवले. वाचन, कुकिंग. किंवा काहीतरी नवीन शिकणे असो मी सर्व गोष्टी त्यात लिहून ठेवते. नुकतेच मी कीबोर्ड कसा चालवायचा ते शिकले आहे. मी त्याचे ऑनलाईन क्लासेस घेत आहे आणि चार क्लास पूर्ण केले आहेत. मला ते खूप आवडत आहे आणि हे लॉकडाऊन चालू आहे तोपर्यंत मी कीबोर्ड नक्कीच तज्ञांप्रमाणे वाजवू लागेन.