अमेरिकेत 60 लाख रुग्णांची कोरोनावर मात
ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत आतापर्यंत 93 लाख 16 हजार 297 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 60 लाख 24 हजार 512 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत शुक्रवारी 1 लाख 01 हजार 461 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 988 जणांचा मृत्यू झाला आहे. 93.16 लाख कोरोना रूग्णांपैकी 30 लाख 56 हजार 626 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 17 हजार 150 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आतापर्यंत 2 लाख 35 हजार 159 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 14 कोटी 29 लाख 50 हजार 353 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
अमेरिकेतील टेक्सासमध्ये कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 9 लाख 49 हजार 971 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 7 लाख 94 हजार 702 रुग्ण बरे झाले आहेत. कॅलिफोर्नियामध्ये 9 लाख 29 हजार 944 जणांना बाधा झाली आहे. त्यामधील 4 लाख 77 हजार 677 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.