पूजा बेदीची मुलीच्या लव्ह लाइफबद्दलची प्रतिक्रिया
बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदी सध्या चित्रपटांपासून दूर आहे, पण मुलाखती आणि सोशल मीडिया पोस्ट्समुळे चर्चेत राहते. तिची मुलगी अलाया फर्निचरवाला हिने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. अलाया स्वतःच्या प्रेमप्रकरणामुळेही चर्चेत असते. अलायाचे नाव ऐश्वर्य ठाकरे याच्याशी जोडले जात आहे. ऐश्वर्य हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आहे. ऐश्वर्य हा स्मिता ठाकरे यांचा मुलगा आहे. अलाया आणि ऐश्वर्य परस्परंना डेट करत असल्याचे वृत्त आहे. स्वतःच्या मुलीच्या लव्ह लाइफबद्दल पूजा बेदीने प्रतिक्रिया दिली आहे.
अलायाच्या खासगी आयुष्यासंबंधी सतत चर्चा होणारच असे तिने म्हटले आहे. पूजा बेदीने अलाया आणि ऐश्वर्य यांच्या डेटिंगचे वृत्त फेटाळले नाही तसेच त्याची पुष्टी दिलेली नाही. माझ्याकाळचे डेटिंग आणि आताच्या डेटिंगमध्ये मोठा फरक पडल्याचे आहे. सध्या प्रत्येक माणूस स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यासाठी स्वतः जबाबदार असल्याचे तिने म्हटले आहे. पूजा बेदीला अलाया या मुलीसह ओमार हा मुलगा आहे.
कॅटरिनासोबत चित्रपटात दिसणार विजय देवरकोंडा
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे सर्वजण जाणतात. त्याचा पहिला बॉलिवूड चित्रपट लाइगर असणार असून यात अनन्य पांडे त्याची नायिका असणार आहे. अनन्यानंतर विजय आता कॅटरिना कैफसोबत रोमांस करताना दिसून येणार आहे.
या चित्रपटासंबंधी निर्माते लवकरच घोषणा करू शकतात. तेलगू अभिनेत्याने दोन चित्रपट स्वीकारले असून यातील एकामध्ये कॅटरिया मुख्य नायिका असणार आहे. विजय देवरकोंडा दिग्दर्शक कोर्तला शिवा यांच्यासोबत काम करणार आहे. हा चित्रपट दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
याचबरोबर कॅटरिना कैफ आणखी एका दाक्षिणात्य अभिनेत्यासोबत चित्रपट करत आहे. मेरी ख्रिसमस या चित्रपटात कॅटरिना ही विजय सेतुपतिसोबत दिसून येणार आहे. तसेच ती फोन भूत या चित्रपटातून झळकणार आहे. या चित्रपटात कॅटरिना हिच्यासह सिद्धांत चतुर्वेदी तसेच ईशान खट्टर मुख्य भूमिकेत असतील.