प्रतिनिधी / महाबळेश्वर
जिल्हयाचे पालकमंत्री ना बाळासाहेब पाटील व आ मकरंद पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे महाबळेश्वर व पांचगणी येथील काही पॉईंट सुरू करण्यास जिल्हाधिकारी यांनी परवाणगी दिली आहे त्याच प्रमाणे काळी पिवळी टॅक्सी व घोडे व्यवसाय सुरू करण्यासही जिल्हाधिकारी यांनी हिरवा कंदील दिल्याने दोन्ही शहरातुन समाधान व्यक्त केले जात आहे
महाबळेश्वर व पांचगणी ही दोन्ही पर्यटन स्थळे मार्च पासुन बंद आहे पर्यटकां अभावी येथील छोटया व्यवसायिकांची उपासमार होवु लागली होती राज्यात अनलॉक चार लागु झाला असुन सर्वत्र व्यवसाय टप्प्या टप्प्याने सुरू होत होता परंतु पर्यटन स्थळ असलेले महाबळेश्वर व पांचगणी येथील व्यवसाय बंदच होते घोड व्यवसायिक टॅक्सी व्यवसायिक व येथील छोटे मोठे व्यवसाय करणारे व्यापारी यांनी आ मकरंद पाटील यांची भेट घेवुन आपली व्यथा मांडली होती व्यवसाया अभावी लोकांची उपासमार होत आहे या कडे लक्ष वेधले आ मंकरंद पाटील यांनी या संदर्भात पालक मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली त्यांना या मध्ये लक्ष घालण्याची विनंती केली पालकमंत्री व आमदार यांनी साराता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेतली व पर्यटन स्थळावरील व्यवसायिकांना आपला व्यवसाय सुरू करण्याची परवाणगी दयावी तसेच पॉईंट चे रस्ते पर्यटकांसाठी खुले करावे अशी मागणी केली होती या संदर्भात लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी आ मकरंद पाटील व पालकमंत्री ना बाळासाहेब पाटील यांना दिले होते दिलेल्या आश्वासना प्रामणे सातारा जिल्हाधिकारी यांनी महाबळेश्वर येथील वेण्णालेक बोटक्लब , पांचगणी येथील टेबल लॅण्ड सुरू करण्यास परवाणगी दिली आहे त्याच प्रामणे घोडे व्यवसायिकांना काळी पिवळी टॅक्सी धारकांना आपला व्यवसाय सुरू करण्यास पारवागणी देण्यात आली आहे या प्रमाणे इनडोअर गेम व्यवसायालाही जिल्हाधिकारी यांनी परवाणगी दिली आहे आ मकरंद पाटील यांनी महाबळेश्वर व पांचगणी येथील व्यवसायिकांच्या मागणी प्रामाणे लक्ष घालुन व जिल्हाधिकारी यांचे कडे पाठपुरावा करून व्यवसाय सुरू करण्यास परवाणगी मिळवुन दिल्या बद्द्ल येथे समाधान व्यक्त केले जात आहे
महाबळेश्वर येथे अनेक पॉईंट असुन ते सर्व आता वन विभागाच्या ताब्यात आहेत हे सर्व पॉईंट सुरू करण्यासही जिल्हाधिकारी यांनी परवाणगी दयावी अशी मागणी केली जात आहे काळी पिवळी टॅक्सी व्यवसाय सुरू करण्यास परवाणगी असली तरी येथील पॉईंट बंद असल्याने टॅक्सी व्यवसायिकांना व्यवसाय मिळणार नाही तेव्हा वेण्णालेक प्रमाणे येथील वन विभागाच्या ताब्यातील पॉइंटही सुरू करण्याची मागणी केली जात आहे