पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांची अविस्मरणीय सेवानिवृत्ती : 34 वर्षाच्या कर्तव्याला समाधानाची किनार
प्रतिनिधी/कोल्हापूर
महाराष्ट्राच्या राजकारणात माजी उपमुख्यमंत्री (कै.) आर. आर. पाटील (आबा) यांनी आपली वेगळी अमीट छाप पाडली होती. त्यांचेच बंधु असणारे राजाराम रामराव पाटील (तात्या) यांनीही पोलीस दलात आपले वेगळेस्थान निर्माण केले आहे. लहानपणी पितृछत्र हरविल्यानंतर आई भागिरथी पाटील यांनी आपल्या लेकरांना संकटांचा सामना करत वाढवले, शिकवले आणि मोठे केले. सर्व मुले कर्तृत्वान निघाली. त्यातीलच एक पोलीस अधिकारी असणारे आर. आर. पाटील. ते गुरुवारी 34 वर्षांच्या पोलीस दलातील अखंड सेवेतून निवृत्त झाले. अधिकारी असले तरी कायम जमिनीवर असणाऱया आर. आर. यांनी आपल्या सेवानिवृत्तीचा शेवटचा दिवस आपल्या मातोश्री भागिरथी यांना समर्पित केला. आई भागिरथी यांना सŸल्युट मारुन ते शेवटच्या डय़ुटीसाठी बुधवार पेठेतील करवीर पोलीस उपविभागीय कार्यालात रवाना झाले. यावेळी मायलेकरांच्या डोळय़ातील आसवांनी गेल्या चार दशकातील दुःख, सुखाच्या आठवणींना उजाळा मिळाला.
सांगली जिल्हय़ातील अंजनी गावातील पाटील परिवार माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्यकतृत्वाने राज्यभर प्रसिद्ध आहे. आर. आर. पाटील यांचे बंधू असणारे पोलीस अधिकारी आर. आर. पाटील यांनीही पोलीस दलात चाणाक्ष, संयमी आणि नम्र अधिकारी म्हणून नाव कमावले. आपल्या बंधूंच्या नावाचा कधीही वापर केला नाही. स्वतचे वेगळेस्थान निर्माण केले. त्या आर. आर. पाटील यांचा पोलीस दलातील गुरुवारी शेवटचा दिवस होता. तो त्यांनी अविस्मरणीय केला.
गुरुवारी सकाळी कोल्हापुरातील आपल्या शासकीय निवासस्थानातून बाहेर पडताना आर. आर. यांनी मातोश्री भागिरथी यांना सŸल्युट केला आणि ते पोलीस दलातील शेवटच्या दिवसाचे कर्तत्व बजावण्यासाठी रवाना झाले. पाटील परिवारासाठी हा क्षण अविस्मरणीय होता. यावेळी आर. आर. पाटील यांच्या पत्नी कुंजलता, मुलगी ज्योती, मुलगा राहूल, बहिण सुमन तुकाराम पाटील आणि रंजना देशमुख आदी उपस्थित होते. ज्या आईने आयुष्यभर हाडाची काड आणि रक्ताचे पाणी करुन आम्हा सर्व भावंडांना लहानाचे मोठे केले, संस्कार आणि शिक्षण दिले. तिलाच सŸल्युट करुन पोलीस दलातील शेवटच्या डय़ुटीला जातानाची अनुभुती आयुष्यभर माझ्या ह्रदयात राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
आबांचा शपथविधी अन् तात्यांचा निरोप समारंभ
भागिरथी पाटील यांनी आयुष्यात केवळ दोनच शासकीय कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवली. आर. आर. पाटील (आबा) यांच्या मंत्रीपदाच्या शपथविधी वेळी त्या मुंबईला गेल्या होत्या. तर गुरुवारी आर. आर. पाटील (तात्या) यांच्या पोलीस दलातील निरोप समारंभांला त्या उपस्थित राहिल्या. यावेळी या मातेच्या डोळय़ातील अश्रुंनी पाटील परिवारातील समाधानाचे दर्शन घडवले.
अंजनीतील मित्र, कार्यकर्ते उपस्थित
आर. आर. पाटील यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला त्यांच्या अंजनी गावातील मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांनी मोठय़ाप्रमाणात उपस्थिती लावली. पाटील यांच्या निवासस्थानी आणि उपविभागीय कार्यालय येथे शुभेच्छा देण्यासाठी स्थानिकांचीही गर्दी झाली होती.