तहसीलदार-आचारसंहिता नोडल अधिकाऱयांच्या बैठकीत सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
ग्राम पंचायत निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली असून मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरुवात झाली आहे. आपापल्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता भंग होणार नाही, यासाठी प्रत्येक निवडणूक अधिकाऱयाने सज्ज राहिले पाहिजे. कोणताही संशय असल्यास तपासणी करून कारवाई करावी, असेही तहसीलदार आर. के. कुलकर्णी व आचारसंहिता नोडल अधिकारी आणि तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी निवडणूक अधिकाऱयांना सांगितले.
तहसीलदार कार्यालयात निवडणूक अधिकाऱयांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी वरील सूचना केल्या आहेत. मतदान करण्याची तारीख जवळ येईल तशी आचारसंहिता भंग होण्याची दाट शक्मयता आहे. सध्या तालुक्यातील बाची, राकसकोप, बेकिनकेरे येथे अबकारी पोलिसांनी तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यांची कामगिरी ते व्यवस्थित बजावत आहेत. मात्र, अंतर्गत आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी आपण साऱयांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. तेव्हा याबाबत गांभीर्याने घ्या, असे आवाहन यावेळी करण्यात आले. निवडणूक अधिकारी आणि सेक्टर अधिकाऱयांची बैठक घेण्यात आली. सध्या मोठय़ा प्रमाणात निवडणुकांना रंग येत आहे. प्रत्येक वॉर्डात चार ते पाचहून अधिक इच्छुक उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे अनेकांकडून मोठय़ा प्रमाणात आमिषे दाखविण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी आचारसंहिता भंग करण्यातही काही जण कमी पडणार नाहीत. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार व आचारसंहिता भंग होऊ नये, यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.