ऑनलाईन टीम / मुंबई :
अयोध्येतील रामजन्मभूमी वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतर केंद्र सरकारनं ट्रस्टला मंजुरी दिली. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत घोषणा केली. या निर्णयाचे मनसे अध्यक्ष यांनी स्वागत करत मोंदीचे अभिनंदन केले आहे.
राज ठाकरे म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ ह्या ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी दिली गेली. ह्या निर्णयामुळे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला आता वेग येईल अशी अपेक्षा. ह्या निर्णयासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून अभिनंदन.
दरम्यान, अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आज मोठा निर्णय घेतला. मंदिराच्या बांधणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार ट्रस्टची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत केली.