प्रतिनिधी/ बेळगाव
सिव्हिल हॉस्पिटलचा संपूर्ण वापर कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे शनिवारी दुपारपासून या इस्पितळात इतर रुग्णांना प्रवश देणे बंद करण्यात आले असून प्रसूती विभागही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाचा फटका सर्वसामान्यांना बसत असला तरी प्रशासनासमोर अन्य पर्याय नाहीत. त्यामुळे संपूर्ण सिव्हिल हॉस्पिटलमधील वॉर्ड कोरोनाबाधितांसाठी वापरण्यात येणार आहे. याआधीच दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना वेगवेगळय़ा इस्पितळात पाठविण्यात येत आहे. तर शनिवारी दुपारपासून कोरोना व्यतिरिक्त इतर सर्वसामान्य आजारांवरील रुग्णांना दाखल करुन घेण्याची प्रक्रिया बंद झाली आहे.
या संबंधी बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांच्याशी संपर्क साधला असता कोरोनाबाधितांची संख्या वाढती आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या असलेली व्यवस्था अपुरी पडत आहे. म्हणून बेडसंख्या वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूती विभाग उत्तमरित्या चालतो. त्यामुळे प्रसूतीसाठी केवळ बेळगावच नव्हे तर जिल्हय़ातील वेगवेगळय़ा तालुक्मयांतून गरीब, मध्यमवर्गीय महिला या विभागात दाखल होतात. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे सिव्हिल हॉस्पिटल आवारातील प्रसूती विभागही बंद करण्यात येणार आहे. हा विभाग येळ्ळूर रोडवरील केएलई चॅरिटेबल शताब्दी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येणार असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
डायलेसिस विभागातही कोरोनाबाधितांना केले दाखल
वैद्यकीय विभागात जागा अपुरी पडल्याने डायलेसिस विभागातही कोरोनाबाधितांना दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय विभागावर नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीतही 50 खाटांची व्यवस्था करण्यात आली होती. तरीही बेड अपुरे पडले. त्यामुळे आपत्कालीन विभागातील ट्रॉमा सेंटर, सर्जिकल ब्लॉक व ऑर्थोपेडिक ब्लॉकही कोरोना रुग्णांसाठी घेण्यात आले होते. तरीही बाधितांना उपचारासाठी बेड मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणून शनिवारपासून या इस्पितळात केवळ कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उपचाराविना युवकाचा मृत्यू… तर सर्पदंश झालेल्या महिलेलाही हलविले
शनिवारपासून कोरोनाबाधित वगळता अन्य रुग्णांवर उपचार बंद करण्यात आले आहे. त्याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसू लागला आहे. हाणामारी, अपघातातील जखमींवर आपत्कालीन विभागात प्रथमोपचार करुन ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार करण्यात येत होते. आता ट्रॉमाचा वापर कोरोनाबाधितांसाठी होवू लागला आहे. म्हणून या रुग्णांना कोठे दाखल करायचे? हा मोठा प्रश्न आहे. पहिल्याच दिवशी याचा फटका सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना बसला आहे. रुक्मिणीनगर येथील एका 45 वषीय युवकाला छातीत कळा आल्याने ऑटोरिक्षातून सकाळी त्याला आपत्कालीन विभागात आणण्यात आले. मात्र वेळेत उपचार मिळाले नाहीत. त्याला ऑटोरिक्षातून खालीही घेण्यात आले नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर दुसऱया घटनेत सोनोली येथील स्वेता शिवाजी झंगरुचे (वय 30) या सर्पदंशामुळे अत्यवस्थ झालेल्या महिलेवर प्रथमोपचार करुन केएलई चॅरिटेबल शताब्दी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. खासगी इस्पितळात गेले की, तुम्ही सिव्हिलला जा, असे सांगितले जाते. सिव्हिलमध्ये तर कोरोनाबाधित वगळता इतर रुग्णांसाठी दरवाजे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे गरीब, मध्यमवर्गीयांना या निर्णयाचा फटका बसणार असून एकंदर स्थिती लक्षात घेता परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.