बेंगळूर/प्रतिनिधी
दक्षिण पश्चिम रेल्वेने कोरोना काळात स्टेशनला प्लॅटफॉर्म गर्दीपासून मुक्त करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत १० रुपयांवरून ५० रुपये केली आहे. त्याचा कालावधी ३० नोव्हेंबर रोजी पूर्ण झाला. दरम्यान कोरोनाची परिस्थिती पाहता रेल्वेने प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म शुल्क ५० रुपये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत टफॉर्म शुल्क ५० रुपये वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
केएसआर बेंगळूर, बेंगळूर कॅन्टोन्मेंट, यशवंतपूर, कृष्णराजपुरम, बंगारपेट, तुमकूर, होसूर, धर्मपुरी, केंगेरी, मंड्या आदी रेल्वे स्थानकांवर ही व्यवस्था असेल.
यशवंतपूर-दानापूर एक्सप्रेस आता ३१डिसेंबरपर्यंत
रेल्वेने 03209/03210 दानापूर-येसवंतपूर-दानापूर सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेस (द्वि-साप्ताहिक) ची सेवा २६ डिसेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही गाडी ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू करण्याचे नियोजन होते. यशवंतपूर येथून पहिली विस्तारित सेवा ३ डिसेंबरपासून सुरू होईल आणि शेवटची सेवा ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.