जीत आरोलकर यांचे यांचे आव्हान
प्रतिनिधी / पेडणे
मांदे मतदार संघांतील आमदार दयानंद सोपटे यांनी हिम्मत असल्यास आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी आपल्या विरोधांत एक विरुद्ध एक असे अपक्ष उमेदवार राहून निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान मांदे उदरगत संस्थेचे संस्थापक व समाजकार्यकर्ते जीत आरोलकर यांनी आमदार सोपटे यांना दिले.
सध्या मांदे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे यांचे चोनसाई येथील जलस्ञोत खात्याच्या अंतर्गत बाधण्यात येणाऱया नाल्या संबंधी आरोप प्रत्यारोप सुरु असून सोशल मीडियावर सध्या जीत आरोलकर व दयानंद सोपटे यांचे विडियो चर्चेचा विषय ठरत आहेत.जीत आरोलकर यांनी दायानंद सोपटे यांनी पार्से येथील हे नाल्याचे काम पूर्णपणे बेकायदेशीर रित्या सुरु केल्याबद्दल आरोप करत या कामात मोठा भ्रष्टाचार असल्याचे सांगितले होते. व त्या कामाची सखोल चौकशी होण्यासाठी संबंधित आधिकारी यांच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती. जीत आरोलकर यांचे आरोप फेटाळत आमदार सोपटे यांनी ते काम आपण शेतकऱयांचे हीत लक्षात घेत पावसाळय़ापूर्वी मुख्यमंञी यांचा नोट घेट निविदा प्रक्रिया सुरु करुन सुरू केल्याचे पञकार परिषदेत आरोप फेटाळत जीत आरोलकर हे राजकारणात नवखे असून त्यांनी अगोदर पंचायतीला निवडून यावे मग आपल्याला शहाणपणा सूचवावा असे आवाहन केले होते.
पंचायत निवडणुकीत निवडून येऊन मगच लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींवर आरोप करताना अगोदर पंचायत निवडणुकीत निवडून येण्याचा जो सल्ला आमदार दयानंद सोपटेंनी आपल्या पार्से – चोंसाई येथील निविदेअभावी केलेल्या नाल्याच्या बेकायदेशीर बांधकामाचा भ्रष्टाचारी स्कॅम उघड केला त्या अनुषंगाने घेतलेल्या मागील पत्रकार परिषदेला उत्तर देताना दिला होता त्याला अनुसरून जीत आरोलकर यांनी रविवार दि.24 रोजी मांदे – मधलामाज येथील आपल्या कार्यालयांत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जीतआरोलकर यांनी आमदार दयानंद सोपटे याना वरीलप्रमाणे आव्हान दिले. जीत आरोलकर पुढे म्हाणाले दयानंद सोपटे यांनी
जिल्हा पंचायत ते आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आतांपर्यंत कधीच आपला कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. प्रत्येकवेळी राजीनामा देणेच त्यांना भाग पडला. काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवल्यानंतर व लगेच राजीनामा देऊन पोटनिवडणुकीला सामोरे गेल्यानंतर मतांच्या टक्केवारीतील फरकच त्याचे पुढील भवितव्य अधोरेखित असल्याचा सरळ आरोप श्री.आरोलकर यांनी केला आहे. पार्से – चोनसाई येथील सर्वे क्रं. 86 / 8 मधील जमिनीत सरकारच्या जलस्रोत खात्यातर्फे नाल्याच्या संरक्षण बांधकामाची ऑनलाईन निविदा उघडण्यापूर्वीच कायदेशीर सोपस्कार पूर्ण न करता केलेल्या बांधकामासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेला अनुसरून आमदार दयानंद सोपटे यांनी दिलेल्या उत्तरांतूनच त्यानी आपली बेकायदेशीर बाजू मान्य केली आहे. तसेच पावसाळय़ांत शेतीची होणारी नासाडी टाळण्यासाठी स्थानिक शेतकऱयांच्या मागणीची दखल घेऊन त्यासाठी मुख्यमंत्र्यांची खास मान्यता मिळवून सदरचे काम पूर्ण करण्याचा जर त्यांनी प्रयत्न केला असे जर त्यांचे म्हणणे असेल तर मुख्यमंत्री अशा पद्धतीची मान्यता देऊ शकतात काय ? जर देत असतील तर त्यांनी या कामाच्या निविदेचा प्रस्ताव का रखडला ? मांदेतील जनतेलाही कळले पाहिजे कि,सरकार कायदेशीर प्रस्ताव पूर्ण न करता अशा पद्धतीने बेकायदेशीर कामांना उत्तेजन देत आहे .हाच माझ्या पत्रकार परिषदेमागचा उद्देश होता असे श्री.आरोलकर म्हणाले. शिवाय त्याही पुढे जाऊन आमदारांनी अशा पद्धतीची मोरजी पंचायत क्षेत्रांतही आपण कामे केल्याचे स्वतःच स्पष्ट केले असल्याचे श्री.आरोलकर बोलताना पुढे म्हणाले.आपण नातेवाईक कंत्राटदाराला निविदा देण्याचा आमदारांचा खटाटोप असल्याचे कुठेच म्हटले नाही .उलट पेडणे तालुक्मयांत चांगले कंत्राटदार असताना सदरची निविदा परप्रांतीय कंत्राटदाराला देण्यामागचा उद्देश काय होता.असा आपला प्रश्न असताना आमदार चुकीची विधाने करतात याचा अर्थ काय. आपण वैयक्तिक पातळीवर जाऊन टिका केलेली नसल्याचे ते म्हणाले. सदर नाल्याच्या बांधकामाची निविदा उघडण्यापूर्वीच नाल्याच्या 31 लाख 47 हजारांच्या संरक्षण भिंत बांधकामाची सखोल चौकशी करून संबंधित प्रकरणांत गुंतलेले जलस्रोत खात्याचे सहाय्यक अभियंते अनिल परुळेकर व अन्य अधिकारी वर्ग यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आपण मुख्य सचिव,जलस्रोत खात्याचे मुख्य अभयंते यांच्याकडे करण्यात आली असून त्याची प्रत मुख्यमंत्र्यांना पाठवल्याची माहिती जीत आरोलकर यांनी यावेळी दिली.
सोपटेने आपल्या नातेवाईकांना नोकऱया दिल्या : जीत आरोलकर
यावेळी पञकारांनी आमदार सोपटे यांनी आपल्या नातेवाईकांना नोकऱया दिल्या अशी चर्चा सध्या मांदे मतदारसंघात आहे त्याबबत तुम्हाला काही माहिती आहे का असा प्रश्न केला असता. जीत आरोलकर म्हणाले की मोरजी पंचायतीच्या माजी सरपंच ह्या दायानंद सोपटे यांच्या नातेवाईक आहेत त्यांना अव्वल कारकूनचा पोष्ट दिला तसेच आपल्या घरातीला एका व्यक्तीला एक नोकरी दिली असून लवकरच ती व्यक्ती कामावर रुजू होणार असल्याचा गौप्यस्पोट जीत यांनी केला. ते म्हणाले की विधानसभा पोटनिवडणूकीत मांदेतील युवकांना आपण प्राधान्य क्रमांने नोकऱया देणार असा प्रचार सोपटे यांनी केला व निवडून आले. माञ त्यांनी मांदेतील युवकांना नोकऱया न देता आपल्याच नातेवाईकांना नोकऱया दिल्या आहेत याचा जाब मांदेतील मतदार सोपटे यांना विचारणार आहेत असे आरोलकर म्हाणाले.