ऑनलाईन टीम / मुंबई :
ज्येष्ठ कवी, गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) तुलना तालिबानशी केली आहे. आरएसएस, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि तालिबान या संघटनांच्या ध्येय्यामध्ये कोणताही फरक नाही. त्यामुळे आरएसएसचे समर्थन करणाऱया लोकांनी आत्मपरिक्षण करावे, असे परखड मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केले आहे.
अख्तर म्हणाले, तालिबान हे जंगली असून, त्यांचे कृत्य निंदनीय आहे. भारतात जे लोक आरएसएस, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे समर्थन करतात, ते देखील तालिबानसारखेच आहेत. कारण ज्या पद्धतीने तालिबानी मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्यासाठी हिंसक प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे आपल्याकडे काहीजण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतात. त्यामुळे अशा लोकांनी आत्मपरिक्षण करावे.
जगातील सर्व उजवे समान असल्याचे सांगत अख्तर म्हणाले, ख्रिश्चन उजवे असो, मुस्लिम उजवे असो किंवा हिंदू उजवे असोत, सर्वांमध्ये समानता आहे. तालिबानला इस्लामिक राज्य निर्माण करायचे आहे. यांना हिंदू राष्ट्र बनवायचे आहे.