दोडामार्ग – वार्ताहर-
दोडामार्ग तालुका आरोग्य विभागामार्फत 15 डिसेंबर रोजी ‘आशा दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम येथील महालक्ष्मी सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त रांगोळी स्पर्धा व आशांची आरोग्य तपासणीत, उत्कृष्ट काम केलेल्या आशांना प्रशस्तीपत्रक वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर योगा आनापान कार्यक्रम, कविता वाचन, फुगडी, गायन स्पर्धा, पथनाट्य असे विविध कार्यक्रम होणार आहेत. तरी या कार्यक्रमास तालुक्यातील आशा सेविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.