दिल्ली/प्रतिनिधी
आर्थिक वर्ष 2020-21 (19 जानेवारी 2021 पर्यंत) मध्ये भारत कोविड 19 आरोग्य यंत्रणा सज्जता आणि आपत्कालीन प्रतिसाद पॅकेज अंतर्गत कोविड 19 चे व्यवस्थापन व प्रतिबंधासाठी राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना 6309.91 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
याव्यतिरिक्त, कोविड-19 सारख्या महामारीत काम करणाऱ्या आशा कार्यकर्त्यांसह सर्व आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज विमा योजना सुरु केली आहे. ही विमा योजना कोविड-19 मुळे मृत्यू झाल्यास 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण देते. भारत कोविड 19 पॅकेज अंतर्गत कोरोना सेवेत कार्यरत असणाऱ्या आशांसाठी दरमहा 1000 रुपयांची तरतूद आहे. नोव्हेंबर, 2020 पर्यंत राज्ये, केंद्रशासित प्रदेशांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, 9,53,445 आशा आणि 36,716 आशा समन्वयकांना पूरक कोरोना पेमेंट मिळाले आहे. दरम्यान अजूनपर्यंत कोणत्याही विलंबाची नोंद नाही.