बेंगळूर / प्रतिनिधी
इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (इग्नू) बेंगळूर प्रादेशिक केंद्राने बॅचलर्स डिग्री, मास्टर्स, पीजी डिप्लोमा आणि डिप्लोमा डिग्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन प्रवेश घेण्याची शेवटची तारीख असेल असे म्हण्टले आहे. इग्नूने प्रवेश प्रक्रियेच्या तारखेमध्ये वाढ केली आहे.
कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी www.ignou.ac.in ला भेट द्या असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच अधिक माहितीसाठी विद्यार्थी प्रादेशिक संचालक जी. एच. इमरापूर यांच्याशी ईमेलद्वारे संपर्क साधू शकतात. rcbangalore@ignou.ac.in@ignou.ac.in किंवा WhatsApp on. 9449337272 वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.