विविध बदलांसह अन्य निवडक बदल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी काळात विमा क्षेत्रामध्ये मोठय़ा प्रमाणात बदल होण्याचे संकेत असून या बदलास प्रारंभ करण्यात आल्याची माहिती आहे. विमा कंपन्यांची नियामक संस्था इरडाने याबाबतचे संकेत दिले आहेत. यामध्ये पॉलिसी इलेक्ट्रॉनिक स्वरुपात सादर करण्यासही या संस्थेने मान्यता दिलेली आहे.
सदरच्या निर्णयासोबत इराडाने साधारण आणि आरोग्य विमा कंपन्यांना आता पॉलीसी इलेक्ट्रॉनिक स्वरुपात सादर करण्यास मान्यता दिलेली आहे. तसेच पॉलीसीधारक आणि अन्य संबंधीत प्रकरणाविषयक माहिती उपलब्ध करुन देण्याचे संकेत असल्याचे इरडाच्या एका वरि÷ अधिकाऱयांने सांगितले आहे.
आम्ही केवळ पॉलिसीधारकच नाही तर त्याच्याशी संबंधीत विषयासाठी विशेष बदल करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या बदलांसह आता विमा कंपन्यांना ई पॉलीसी सादर करण्यास मान्यता देत आहे. हळूहळू येत्या काळात यामध्ये मध्यवर्ती शाखा, एजन्ट आणि पॉलीसीधारकांमधील असणारी कामाची पद्धत बदलून नव्या नियमावलीसोबत प्रणाली सादर करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण इरडाने यावेळी दिले आहे.
डिजिटलवर भर
आम्ही येत्या काळात एजन्ट आणि अन्य डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करुन पॉलीसी विक्री करण्यावर भर देणार आहे. विमा उत्पादने अधिक आकर्षक बनविण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही इरडाने सांगितले आहे.