खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी /बेळगाव
सोशल मीडियावर राष्ट्रपुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सरकारतर्फे स्वतः फिर्याद दिली आहे. इन्स्टाग्रामवर राष्ट्रपुरुषांचा अवमान करणारे एक चित्र अपलोड करण्यात आले होते. त्यामुळे एकच खळबळ माजली होती. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच स्वयंप्रेरणेने पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली आहे. ही वादग्रस्त पोस्ट कोणी केली? याचा तपास करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर पुढील तपास करीत आहेत.