ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना लखनऊमधील पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाच्या टीमकडून त्यांचे नमुने घेण्यात आले होते. त्यात त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांच्या संख्येने 3 लाख 12 हजारांचा टप्पा पार केला आहे. तर आता पर्यंत 4,429 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत 68, 122 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आता पर्यंत 2 लाख 39 हजार 485 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.