ऑनलाईन टीम / हल्द्वानी :
उत्तराखंड बॉर्ड परीक्षांचे निकाल 25 ते 30 जुलै या कालावधीत जाहीर केले जाणार आहेत, अशी माहिती बोर्डाचे निर्देशक आर. के. कुंवर यांनी शुक्रवारी दिली.
ते म्हणाले, उत्तराखंड बोर्डच्या परीक्षांचे निकाल बोर्डाचे अधिकृत संकेतस्थळ ubse.uk.gov.in यावर जाहीर केले जाणार आहेत. दहावी बारावी च्या विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी बोर्डाची अधिकृत वेबसाईट ubse.uk.gov.in वर जावे त्यानंतर एक्झाम रिझल्ट यावर क्लिक करावे. त्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वरून आपला रोल नंबर टाकावा लागेल त्यानंतर आवश्यक ती माहिती भरावी लागेल. त्यानंतर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल. तसेच निकाल डाउनलोड ही करता येणार आहे.
पुढे ते म्हणाले, यावर्षी हायस्कूल इंटरमीडिएट (दहावी – बारावी) ची परीक्षा जवळपास 2 लाख विद्यार्थ्यांनी दिली होती. परीक्षेसाठी यंदा प्रदेशात जवळपास 1324 परीक्षा केंद्र उभारण्यात आली होती.