ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात मागील 24 तासात 449 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 9 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 90 हजार 616 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल 14,634 रिपोर्ट निगेटिव्ह आले. काल आढळलेल्या 449 रुग्णांमध्ये अलमोरा जिल्ह्यात 17, बागेश्र्वर 08, चमोली 11, चंपावत 11, देहरादून 157, हरिद्वार 38, नैनिताल 108 पौरी गरवाल 9, पिथोरगड 38, रुद्र प्रयाग 08, तेहरी गरवाल 08, यू एस नगरमधील 22 आणि उत्तर काशीमधील 14 जणांचा समावेश आहे.
4,963 रुग्णांवर उपचार सुरु
दिलासादायक बाब म्हणजे काल 724 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर आतापर्यंत प्रदेशात 82,967 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.56 टक्के इतके आहे. तर सध्या 4 हजार 963 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 1,504 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले.