बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात उद्योग कामगारांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येईल, असे सांगत राज्य सरकारने एक परिपत्रक काढले आहे. कोरोनामुळे औद्योगिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संख्याही जास्त आहे. दरम्यान, उत्पादन प्रक्रियेचा विचार करून का निर्णय घेतला आहे.
दरम्यान ४५ वर्षांवरील कामगार जवळच्या आरोग्य केंद्रास भेट देऊ शकतात किंवा प्रादेशिक मुख्य आरोग्य अधिकारी आणि उद्योग सहसंचालक (जेडी) यांच्याशी समन्वय साधू शकतात. कामगारांचे लसीकरण करण्यासाठी राज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटातील कामगारांची यादी तयार करण्यास सांगितले आहे. या परिपत्रकात कामाच्या ठिकाणी लसीकरण शिबिरांना प्रोत्साहन देण्यात आले आहे.
यापूर्वीही सरकारने कामाच्या ठिकाणी जाऊन कामगारांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. अनेक कामगारांचे लसीकरण देखील केले आहे. दरम्यान राज्यात लस उपलब्धतेचा विचार करता लसीकरण मोहीम संथ गतीने सुरु आहे. राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी जूनमध्ये ६० लाख डोस देण्यात येणार असल्याचे सांगून २ कोटी लसीकरण मोहिमेचा टप्पा पूर्ण करणार असल्याचे म्हंटले आहे.