वृत्तसंस्था/ रिओ डे जेनेरिओ
एटीपी टूरवरील ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या रिओ खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत कार्लोस ऍल्कारॅत्झ आणि मॅटो बेरेटेनी यांच्यात एकेरीची उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे.
शुक्रवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या सामन्यात इटलीच्या बेरेटेनीने ब्राझीलच्या माँटेरिओचा 6-4, 6-7 (6-8), 6-3 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. गेल्या जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत इटलीच्या टॉप सीडेड बेरेटेनीने एकेरीची उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य सामन्यात बेरेटेनीला स्पेनच्या विजेत्या नदालकडून हार पत्करावी लागली होती. दुसऱया उपांत्य सामन्यात सातव्या मानांकित ऍल्कारॅत्झने डेलबोनीसचा 6-4, 7-6 (7-1) असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले.