वृत्तसंस्था / मुंबई :
देशातील अग्रेसर होम फायनान्स कंपनी एचडीएफसी लिमिटेडकडून येत्या काळात प्रॉपर्टीचा ऑनलाइन शो सादर करण्यात येणार आहे. या शोत दिल्ली आणि एनसीआरमधील 75 पेक्षा अधिक डेव्हलपर्स 150 पेक्षा अधिक प्रकल्प सादर करणार आहेत.
सदरचा शो https://delhi.hdfcpropertyfair.com वर सादर हेणार आहे. याची सुरुवात दिल्ली आणि एनसीआरमधून 10 जूनपासून करण्यात आली आहे. तरी येत्या महिनाभर हा शो सुरुच राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. मुंबईत हा शो पुढील आठवडय़ात सुरु केला जाणार आहे.
एचडीएफसीने ग्राहकांची अडचण लक्षात घेत ऑनलाइन अर्जाद्वारे आवडणाऱया घरांची खरेदी करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. तसेच ही सुविधा प्रॉपर्टी पोर्टलवर मिळणार आहे.