शरद बोबडे यांनी केली केंद्र सरकारकडे शिफारस
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती एन. व्ही. रमण यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सरन्यायाधीश पदासाठी नवीन नाव सुचविण्याची सूचना करण्यासाठी शुक्रवारी सरन्यायाधीश बोबडे यांना पत्र पाठवले होते. त्यानुसार त्यांनी ही शिफारस केली आहे. न्यायमूर्ती रमण हे आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्हय़ातील पोन्नावरम गावातील एका शेतकरी कुटुंबातील आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाल पुढील महिन्याअखेरीस म्हणजे 23 एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे नवीन सरन्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्र सरकारकडून सरन्यायाधीश पदासाठी नवीन नाव मागविण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी सर्वात जास्त अनुभव असलेल्या न्यायमूर्तींची नियुक्ती केली जाते. सध्या शरद बोबडे यांच्यानंतर एन. व्ही. रमण हे सर्वाधिक ज्ये÷ न्यायमूर्ती आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून रमण यांचे नाव सुचविले आहे. 64 वषीय न्यायमूर्ती रमण यांनी 10 फेब्रुवारी 1983 पासून आपल्या वकिलीला सुरुवात केली. त्यांनी यांचे बी.एस्सी, बी.एल. शिक्षण झालेले असून संविधान, फौजदारी आणि आंतरराज्य नदी कायद्यांमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केले आहे.