नवी दिल्ली
भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. याशिवाय एसबीआयने आरडी योजनेतील व्याजदरही वाढवले आहेत. मंगळवारी जाहीर होणाऱया अर्थसंकल्पापूर्वीच स्टेट बँक ऑफ इंडियाने अल्प मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करत ठेवीदारांना किंचित दिलासा दिला. बँकेने 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 0.10 टक्क्मयांनी वाढ केली आहे. आपल्या वेबसाईटवर एसबीआयने यासंबंधीची माहिती दिली आहे. वाढीव नवीन व्याजदराचा लाभ ग्राहकांना 22 जानेवारीपासून मिळणार आहे.