नवी दिल्ली
विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी (एफपीआय) यांनी ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात भारतीय भांडवली बाजारामध्ये 8,327 कोटी रुपये गुंतवले आहेत. भारतामधील मोठय़ा कंपन्यांकडून अंदाजापेक्षा अधिकचे चांगले तिमाहीतील नफा कमाईचे आकडेवारी सादर झाल्यानेच एफपीआयमध्ये गुंतवणूक वाढली असल्याचे दिसून आले आहे.
डिपॉझिटरच्या आकडय़ानुसार तीन ते सहा ऑगस्ट दरम्यान विदेशी गुंतवणूकदारांनी समभागांमध्ये 7,842 कोटी रुपये गुंतवले आहेत. कर्ज आणि ब्रॉड बाजारात ही गुंतवणूक 485 कोटी रुपये राहिले आहे. याच प्रकारे यांची निव्वळ गुंतवणूक 8,327 कोटी रुपयाच्या घरात असल्याचे स्पष्ट केले आहे.
लॉकडाऊन आणि कोविड 19 ची वाढती प्रकरणे असूनही भारतामधील मोठय़ा कंपन्याचे तिमाही अहवाल सकारात्मक आले आहेत. यामुळे देशातील एफपीआयमधील गुंतवणूक वधारत गेल्याचे दिसत आहे.