वार्ताहर / कंग्राळी खुर्द
येथील शिवप्रति÷ान हिंदुस्थान शाखेच्यावतीने आयोजित दुर्गामाता दौडची रविवारी सांगता झाली. सकाळी 6 वा. गावच्या प्रवेशद्वारातील शिवपुतळय़ाचे पूजन एपीएमसी पोलीस स्थानकाचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. एन. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मानाच्या ध्वजाचे मानकरी पोलीस निरीक्षक जावेद मुसाफिर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. मानाच्या ध्वजाचे पूजनसुद्धा एस. एन. पाटील यांनी करून श्रीफळ वाढविण्यात आला. यावेळी प्रेरणामंत्र, गणपतीची आरती, शिवरायांची आरती झाल्यानंतर जयघोष करत दौड महालक्ष्मी मंदिराकडे मार्गस्थ झाली.
महालक्ष्मी मंदिरामध्ये विधिवत पूजा करण्यात आली. या ठिकाणी शिवप्रति÷ानचे कार्याध्यक्ष आर. आय. पाटील यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर महाआरती आणि ध्येयमंत्र झाला. यावेळी शिवप्रति÷ानचे मनोहर पाटील, परशराम मेंडके, गजानन पाटील, तालिम मंडळाचे अध्यक्ष परशराम पाटील, उमेश ताशिलदार यांच्यासह जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, रुक्मिणी निलजकर, ललिता जाधव, शुभांगी पुजारी, अनिता बाळेकुंद्री, सरिता सोमाजीचे, लक्ष्मी पाटील, अनिता बेळगावकर, अनिता पाटील, अश्विनी साबळे यांच्यासह शिवप्रति÷ानचे कार्यकर्ते, युवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.