बेंगळूर/ प्रतिनिधी
कोरोनाचा फैलाव झाल्यांनतर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यावेळी जीवनावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय, उद्योग बंद होते. यामुळे देशासह राज्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे. यामध्ये देशासह राज्यांना मद्यविक्रीतून मोठा महसूल मिळतो. कर्नाटकात एप्रिलमधील लॉकडाऊन आणि मेमध्ये दारूवर मोठा वाढीव कर लागू केल्याने राज्य सरकारच्या सर्वात मोठ्या महसूल स्त्रोतांपैकी एक असणाऱ्या दारू विक्रीवर मोठा परिणाम झाला.
मद्यावरील वाढीव एप्रिल ते जून या तिमाहीत राज्यात दारूची विक्री 33 टक्क्यांनी घटली आहे. या एप्रिल व जून दरम्यान मद्य विक्रीतीत घसरण झाली आहे. परिणामी राज्याने तिमाहीत महसूल उत्पादन शुल्कात 3,846 कोटी रुपये जमा केले, पण मागील वर्षाच्या तिमाहीच्या तुलनेत महसुलामध्ये 1,913 कोटी रुपयांची घसरण झाली आहे.