बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) एकत्रित लढणार असल्याची चर्चा आहे. पण कॉंग्रेस पक्षाने त्यांचे आघाडीचे सहकारी जनता दल (सेक्युलर) यांच्याशी निवडणुकीसंदर्भात चर्चा सुरू असल्याची अफवा असल्याचे सांगितले. दरम्यन कॉंग्रेसचे विधानसभेचे नेते सिद्धरामय्या यांनी बुधवारी काँग्रेस दोन्ही जागा स्वबळावर लढणार असल्याचे संगितले.
सिद्धरामय्या यांनी कॉंग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि आमच्यात स्वबळावर निवडणुका लढवण्याचे सामर्थ्य आहे. कर्नाटकातील दोन विधानसभा मतदारसंघांसाठी – सिरा (तुमकुर) आणि राजराजेश्वरी नगर (बेंगळूर) येथे पोटनिवडणूक होणार आहेत.
भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) मंगळवारी कर्नाटकातील रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांपैकी दोन – सीरा (तुमकुर) आणि राजराजेश्वरी नगर (बेंगळूर) मधील पोट-निवडणुका जाहीर केल्या आहेत.
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. १० नोव्हेंबर रोजी निकाल लागतील. ९ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्याची अधिकृत राजपत्र अधिसूचना जारी केली जाणार आहे. तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर असणार आहे.