कोप्पळ/प्रतिनिधी
राज्यभरात विविध नागरिकांच्या संघटनांनी व धार्मिक संघटनांनी कोविड केअर सेंटर (सीसीसी) ची स्थापना करुन साथीच्या आजाराविरुद्धच्या लढाईत सरकारला मदत केली आहे. कोप्पळमध्ये, उद्योगपतींनी धोकादायक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि कोरोना काळात मदत होण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान केवळ कामगारांच्या आणि कुटुंबियांच्या लसीची व्यवस्था नाही तर कोप्पळमध्ये सीसीसी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे नुकसान होऊनही, कोप्पळ इंडस्ट्रीज असोसिएशनकडे नोंदणीकृत विविध कंपन्यांच्या प्रमुखांनी मुख्यतः ग्रामीण भागातील गरीब कोरोना रूग्णांची देखभाल करण्यासाठी २०० बेडचे सीसीसी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात रूग्णांना स्वत: ला अलग ठेवण्यासाठी सुविधा नाहीत.
कोप्पळचे डीसी विकास किशोर सुराळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मे मध्ये उद्योगांच्या प्रतिनिधींची भेट घेतली आणि सरकारच्या आरोग्य सुविधांच्या पायाभूत सुविधांवरचा ताण कमी करण्यासाठी त्यांना सुसज्ज सीसीसीची आवश्यकता असल्याचे सांगितले. “या बैठकीनंतर कोप्पळ जिल्हा प्रभारी मंत्री बी.सी. पाटील यांनीही कॉर्पोरेट क्षेत्राकडून अर्थसहाय्यित अशा सीसीसीची गरज असल्याचे म्हंटले होते. बैठकीनंतर दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत उद्योजकांनी कार्यवाही केली आणि सीसीसीवर काम सुरू केले. दरम्यान २०० बेडचे सीसीसी तीन किंवा चार आठवड्यांत पूर्ण चालू होईल असा अंदाज आहे. हा तात्पुता सेटअप असूनही दोन वर्षांपर्यंत टिकून राहणे आवश्यक आहे, असे डीसी सुराळकर यांनी सांगितले.