बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना सुरक्षितता बाळगत परीक्षा घेण्यात आल्या. यामध्ये ३० आणि ३१ जुलै रोजी राज्यात केसीईटी परीक्षा घेण्यात आली. यामध्ये कोरोना बाधित असणाऱ्या आणि परीक्षेस फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा देण्यास मुभा देण्यात आली होती. परीक्षेवेळी त्यांची विशेष व्ययस्था करण्यात अली होती. यातील दोन विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
याविषयी उपमुख्यमंत्री अश्वनाथनारायण यांनी लक्षणे नसलेल्या पण कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी २१४ आणि ६१५ रँक प्राप्त केला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. एकूण ६३ कोरोना पॉझिटिव्ह उमेदवारांनी ३०जुलै, ३१ रोजी परीक्षा दिली होती.