बेंगळूर/प्रतिनिधी
सिरा मधील भाजपचे उमेदवार डॉ.बी.एम. राजेश गौडा यांनी कॉंग्रेस उमेदवाराचा जवळपास १३ हजार मतांनी पराभव केला आहे. राजेश गौडा यांनी सहा वेळा आमदार राहिलेले आणि कॉंग्रेसचे उमेदवार टी. बी. जयचंद्र यांचा पराभव केला.
भाजपचे राजेश गौडा यांना ७४,५२२ मते मिळाली. तर कॉंग्रेसचे उमेदवार टी. बी. जयचंद्र यांना ६१,५७३ मते मिळाली. जेडीएसचे जनता दल सेक्युलरचे उमेदवार अम्माज्मा हे तिसर्या क्रमांकावर राहिले. त्यांना ३५,९८२ मते मिळाली आहेत.