बेंगळूर/प्रतिनिधी
नवी दिल्लीत शेती कायद्याविरोधात निषेध नोंदविणार्या शेतकऱ्यांच्या समर्थकांना आणि कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा म्हणून कर्नाटकमधील शेतकर्यांनी प्रजासत्ताक दिनी बेंगळूरमध्ये ट्रॅक्टर रॅली काढण्याची मोठी योजना आखली आहे.
कर्नाटक राज्य रायत संघाचे (केआरआरएस) नेते, कोदिहल्ली चंद्रशेखर यांनी २६ जानेवारीला दहा हजारहून अधिक ट्रॅक्टर रॅलीत भाग घेतील. सुमारे २५ हजार शेतकरी बेंगळूरमध्ये दाखल होतील आणि मुख्य रस्त्यांमधून स्वातंत्र्य उद्यानात येतील. बेंगळूर येथे १० हजारांहून अधिक ट्रॅक्टर व इतर वाहनांसह शेतकरी दाखल होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर काही वेळातच प्रर्दशन सुरू करण्याचे नियोजित आहे, असे ते म्हणाले.