बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट बुधवारीही कायम राहिली. राज्यात बुधवारी ४२६ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात ४३३ रूग्ण कोरोनावर मात करून रुग्णालयातून घरी परतले. तर दोन संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५,९१५ आहे. दरम्यान, राज्यात कोविड -१९ चे लसीकरण सुरू आहे.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. बुधवारी जिल्ह्यात २३१ पॉझिटिव्ह प्रकरणांची नोंद झाली आहे. यासह जिल्ह्यात एकूण सक्रिय प्रकरणांची संख्या ३८५६ आहे. बेंगळूर शहरी जिल्ह्यात बुधवारी १५९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,३९७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.