बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मंगळवारी राज्यातील कोविड -१९ युद्ध कक्षांना भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना २०-३० दिवस रूग्णालयाच्या बेडवर असलेल्या ८०० हून अधिक रुग्णांना डिस्चार्ज देण्याचे निर्देश दिले. तसेच यावेळी २४ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद दिले.
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मगदी रोडवरील आरोग्य सौध आणि मल्लेश्वरममधील कोविड -१९ वॉर रूम्सना भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भेटीदरम्यान चोवीस तास कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचार्यांना धन्यवाद दिले. दरम्यन, बेंगळूर दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी कोरोना बेड घोटाळा उघडकीस आणला. या प्रकरणाच्या एका आठवड्यानंतर, कर्नाटकचे मुख्यमंत्री बेंगळूर बीबीएमपी वॉर रूमला भेट दिली.
भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले की, “ज्या प्रकारे आमच्या वॉर रूम कार्यरत आहेत ते संपूर्ण देशाचे एक मॉडेल आहे.” “मला असे वाटत नाही की कुठेही अशी कुठेही उत्तम युद्ध कक्ष प्रणाली नाही. इथले लोक २४ तास काम करतात. मी त्यांचे अभिनंदन केले, ” असे ते म्हणाले.
येडियुरप्पा यांना बेंगळूरमध्ये रूग्णालयाच्या बेड्सच्या सध्याच्या वापराचा डेटा देण्यात आला होता. शहरात सध्या १२,२९९ बेड आहेत, असे त्यांना सांगण्यात आले. “डेटा इतका अचूक आहे: ६५०० रुग्ण १-१० दिवसांपर्यंत आहेत, ११-२०दिवसांसाठी १९००, २० दिवसांकरिता ५०३ आणि ३० दिवसांकरिता ३३७ रुग्ण आहेत.” “एकूण ९ २४२ रुग्ण आहेत.”