बेंगळूर/प्रतिनिधी
देशात दुसऱ्या कोरोना लाटेची संभावना आहे. काही राज्यात लॉकडाऊन करण्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. मात्र कर्नाटकात कोरोनाचे प्रमाण कमी कमी होत आहे. मंगळवारी राज्यात ३८३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर राज्यातील विविध जिल्ह्यातून ३७८ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णायातून घरी परतले. तर चार कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६,०६२ इतकी आहे. राज्यात आतापर्यंत १२,३०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्याही बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. तसेच सध्या उपचारात असणाऱ्या रुग्णांची संख्याही बेंगळूर शहरी जिल्ह्यात सर्वाधिक आहे. दरम्यान मंगळवारी जिल्ह्यात २४० कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यासह जिल्ह्यात सक्रिय प्रकरणांची संख्या देखील ४,३८० वर पोहोचली आहे. दरम्यान शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,४५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.