बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये शुक्रवारी गुरुवारच्या तुलनेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली. शुक्रवारी ७०८ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर ६४३ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच राज्यात तीन मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान राज्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९,३०,६६८ वर पोहोचली आहे. यापैकी ९,०९,७०१ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. दरम्यान राज्यात सध्या ८९७० पॉझिटिव्ह रुग्ण उपचारात आहेत. तर राज्यात आतापपर्यंत कोरोनामुळे १२,१५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बेंगळूर शहरी जिल्ह्यात शुक्रवारी ३९९ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात दोन मृत्यूची नोंद झाली आहे. म्हैसूर आणि दक्षिण कन्नडमध्ये कोरोनाची २७ प्रकरणे नोंदली गेली, त्यानंतर तुमाकुर २९ आणि कलबुर्गी येथे २४ प्रकरणे नोंदली गेली आहेत.
राज्यात आतापर्यंत एकूण १,५७,८९,९७८ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी शुक्रवारी ८४,८४९ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली.आतापर्यंत, युकेहून परत आलेले ४७ प्रवासी पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्यांच्या प्राथमिक संपर्कांपैकी २६ जणांनीही सकारात्मक चाचणी घेतली आहे. आतापर्यंत १४ व्यक्तींनी यूकेच्या नवीन विषाणूची लागण झाली आहे.