बेंगळूर/प्रतिनिधी
लैंगिक छळाचा आरोप असलेले भाजपचे माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांना अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान लैंगिक अत्याचार व छळ केल्याचा आरोप करणारी महिला मंगळवारी बेंगळूर येथे दंडाधिकाऱ्यांसमोर हजर होत आपला जबाब नोंदविला.
टीव्ही वाहिन्यांद्वारे व्हिडिओ सीडी प्रसारित झाल्यापासून म्हणजे २ मार्चपासून बेपत्ता असणारी ही महिला तिच्या वकिलांबरोबर मंगळवारी दुपारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर झाली.
२६ मार्च रोजी बेंगळूर पोलिसांनी त्यांच्या वकिलांमार्फत महिलेला पाठवलेल्या तक्रारीवर कारवाई करत जारकिहोळी विरोधात आयपीसी कलम ३५४ आणि ३७६ )सी) अंतर्गत मारहाण आणि लैंगिक संबंधाची तक्रार दाखल केली होती.
क्यूबन पार्क पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत महिलेने आरोप केला की जारकिहोळी यांनी तिला सरकारी नोकरीची ऑफर देऊन लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली आणि नंतर त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करण्यास नकार दिला.
जारकिहोळी यांनी तिला व्हिडिओ कॉलवरून लैंगिक सुस्पष्ट संभाषण करण्यास भाग पाडले आणि नंतर बेंगळूर येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये तिला भेटायला लावले व तेथे तिच्यासोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले, असा तिने आरोप केला आहे.
मंगळवारी तिने आपले निवेदन नोंदविल्यानंतर तिचे वकील के. जगदीश यांनी पीडितेला तिचे म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयात हजर करण्याचे वचन आम्ही पूर्ण केले आहे. पोलिसांनी आता आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे आणि मोकळेपणाने फिरत असलेल्या आरोपीला अटक केली पाहिजे. ”
कोर्टाच्या हजेरीनंतर या महिलेला तिच्या वकिलांनी व्हिडीओ नमुना आणि टीव्ही वाहिन्यांद्वारे व्हिडिओ सीडीवरून दाखल केलेल्या इतर खटल्यांसाठी निवेदनासाठी पोलीस तांत्रिक कक्षाकडे नेले होते.