बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात १ जानेवारीला शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर अधिक शिक्षक व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मंगळवारी राज्यातील विविध भागांत ५० शिक्षकांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून अनेक शाळा बंद ठेवल्या आहेत. तसेच शाळा सुरु होण्याआधी या शिक्षकांच्या चाचण्या केल्या आहेत.
दरम्यान बेळगावमध्ये २२ शिक्षकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच त्यांचा सहकारी किंवा विद्यार्थ्यांशी संपर्क नाही. बेळगाव तालुक्यातील कडोली गावात एका शिक्षकाकोरोना झाल्यानंतर शाळा एक दिवस बंद होती.
बेळगाव शैक्षणिक जिल्हा सार्वजनिक सूचना उपसंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षकांनी गेल्या आठवड्यात कोविड -१९ चाचणी केल्या आहेत. ज्यांना लक्षणे आहेत त्यांना शाळेत न येण्यास सांगण्यात आले आहे.
मंगळवारपासून चित्रदुर्ग जिल्ह्यातील सात शाळा दोन दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत. सहा शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये चार महिला शिक्षक आणि द्वितीय विभाग सहाय्यक अशा सहा शिक्षकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चित्रदुर्ग डीडीपीआय रविशंकर रेड्डीयांनी सर्वांना घरी अलग ठेवण्यात आल्याचे सांगितले आहे. तसेच सर्व शाळांची स्वच्छता करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.