बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात राजकीय पक्षांकडून २०२३ च्या निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी केली जात आहे. नेते कोणत्याही परिस्थितीत सत्ता आणण्यासाठी दौरे करून नव्याने पक्षबांधणी करत आहेत. ज्या भागात पक्ष कुमकुवत आहेत त्या भागात विशेष लक्ष देत आहेत. दरम्यान, राज्यात काँग्रेस चांगलीच आक्रमक झालेली दिसत आहे. तसेच जेडीएस देखील सत्ता आणण्यासाठी रणनीती आखत आहे. तर भाजप देखील आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी त्या दृष्टीने काम करत आहे. परंतु जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी २०२३ च्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्वपूर्ण भाष्य केलं आहे. ज्याप्रमाणे नुकत्याच झालेल्या दक्षिण भारतातील विधानसभा निवडणुकीत राज्यातील नागरिकांनी राष्ट्रीय पक्षांना नाकारले त्या प्रमाणेच २०२३ ला सुद्धा कर्नाटकातील जनता राष्ट्रीय पक्षांना नाकारेल असे म्हंटले आहे.
दरम्यान जद (एस) नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी शुक्रवारी सांगितले की, दक्षिण भारतातील इतर राज्यांप्रमाणेच कर्नाटकसुद्धा २०२३ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रीय पक्षांना नाकारेल आणि प्रादेशिक पक्षाची निवड करेल, कारण लोकांना प्रशासन उच्च कमांडने चालवावे असे वाटत नाही. कुमारस्वामी यांनी दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलं.