बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मंगळवारी आपत्कालीन परिस्थितीत कोविड -१९ रूग्णांना मदत करण्यासाठी एक नाविन्यपूर्ण ऑक्सीबस सेवा सुरू केली. प्रत्येक अस्थायी ऑक्सीबसच्या माध्यमातून आठ रूग्णांना आधार मिळणार आहे , असे ते म्हणाले.
“अशी २० युनिट बेंगळूरमधील सरकारी रुग्णालये आणि अन्य ठिकाणी उभारली जातील, आणि राज्यभरात आणखी काही युनिट्सची स्थापना केली जाईल,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी मगदी रोडयेथील ‘आरोग्य सौदा’ आणि मल्लेश्वरम येथील बीबीएमपीच्या युद्ध कक्षात बेड वाटप प्रणालीच्या कामकाजाचा आढावा घेऊन नागरी हेल्पलाईनला भेट दिली. कोविड -१९ रूग्णांना वेळेवर बेड उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रणालीमध्ये पारदर्शकता व कार्यक्षमता सुनिश्चित करीत आहोत, असेही ते पुढे म्हणाले.