बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये कोरोनाची चिंताजनक आकडेवारी शुक्रवारीही कायम राहिली. राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोना संसर्गाची ८,९६० नवीन प्रकरणे समोर आली आहेत. बेंगळूरमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असुन गेल्या २४ तासांत २,७२१ रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी गेल्या चोवीस तासात राज्यात एकूण १३६ कोरोना-संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात शुक्रवारी ७,४६४ रुग्णांनी कोरोनावर मत केली. या सर्वांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे ८६,३४७ सक्रिय रुग्ण आहेत. तर शुक्रवारी राज्यात ६४,२२६ चाचण्या घेण्यात आल्या.