बेंगळूर/प्रतिनिधी
देशभरात आज शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रेल रोको आंदोलन सुरु आहे. दरम्यान कर्नाटकातील शेतकऱ्यांनी संघटनांच्या देशव्यापी आवाहनाला पाठिंबा दर्शविला असून, राज्यातील शेतकरी संघटनांनी गुरुवारी दिल्लीत निषेध करणाऱ्या शेतकर्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी रेल्वे रोको करणार आहेत.
कर्नाटकात सकाळी १२ ते दुपारी ३ या वेळेत रेल्वे रोकोकरणार आहेत. यासाठी शेतकरी गटांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणला जाईल.
दरम्यान बेंगळूर, म्हैसूर, हुबळी-धारवाड, बेळगाव आणि कर्नाटकच्या इतर भागांतील हजारो शेतकरी राज्यातील महत्त्वाच्या रेल्वे जंक्शनवर निदर्शने करणार आहेत.